Friday, April 14, 2023
ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS-14/04/2023
नमस्ते मुलांनो ! कसे आहात ? मज्जा येतेय ना इंग्रजी भाषा अभ्यासाच्या Interactive Worksheets सोडवताना ? मला दिसतात तुमचे प्रतिसाद. उत्तम प्रतिसाद देत आहात तुम्ही सर्वजण. त्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप कौतुक आणि मनापासून अभिनंदन.
आज तुमच्यासाठी इंग्रजी भाषा अभ्यासाची नवीन worksheet घेऊन आलोय. या worksheet चे स्वरूप अगदीच सोप्पं आहे. यात तुम्हाला तीस मराठी प्रश्नार्थक वाक्ये दिसतील. सोबतच त्या मराठी वाक्यांच्या खाली इंग्रजी भाषेतील तीन वाक्ये दिसतील. त्या तीन इंग्रजी वाक्यांतील कोणते तरी एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर (Correct English Translation) आहे. त्या तीनही इंग्रजी वाक्यांच्या डाव्या बाजूस छोट्याशा आकाराच्या चौकटी दिलेल्या आहेत.त्या चौकटींना checkbox (चेकबॉक्स) म्हणतात. अचूक इंग्रजी भाषांतर असलेल्या वाक्यांच्या डाव्या बाजूस लागून असलेल्या चेकबॉक्स ला क्लिक करा.
संपूर्ण worksheet सोडवून झाल्यानंतर काय करायचे हे तुम्हाला माहीत आहेच.
Worksheet च्या शेवटी Finish लिहिलेलं बटन दिसेल त्यावर क्लिक करायचे...स्वतःचे नाव लिहून पुन्हा एकदा Finish बटन दाबायचे....चला तर मग सोडवा ही आजची ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET...Wish you all the best!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...

-
मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठ...
-
प्रिय सर्व, यंदा इयत्ता १ लीत दाखलपात्र बालकांच्या इंग्रजी भाषा अध्ययन तयारीसाठी उपयुक्त अशी दुसरी INTERACTIVE WORKSHEET आज घेऊन आलोय.या WOR...
-
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा अभ्यास.दि.०९ मार्च २०२३ 👇 ■■■◆◆◆◆◆■■■◆◆◆◆◆■■■■■■◆◆◆◆◆■■■◆◆ What do you have Sumit ? = तुझ्याजवळ क...
No comments:
Post a Comment