GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Saturday, November 14, 2026

इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती गणित – अपूर्णांक ऑनलाइन सराव Quiz (३० प्रश्न)

Std 4 Scholarship - Maths - Fractions Quiz
🍕 🍰 ➗

अपूर्णांक

इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा • गणित • १२% भारांश

या घटकात काय आहे?
  • अपूर्णांकाचा अर्थ, वाचन व लेखन
  • व्यवहारी अपूर्णांक : समच्छेद, भिन्नच्छेद, लहानमोठेपणा, चढता-उतरता क्रम
  • अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक
  • तुलना व परस्पर रूपांतर

१. अपूर्णांकाचा अर्थ, वाचन व लेखन

पूर्णाचे समान भाग केल्यावर घेतलेल्या भागांना अपूर्णांक म्हणतात.
अंश (वरची संख्या) = घेतलेले भाग. छेद (खालची संख्या) = एकूण समान भाग.
पट्टीचे 4 समान भाग, त्यापैकी 3 रंगीत = 3/4वाचन : तीन बटे चार • 5/8 = पाच बटे आठ

२. समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांक

समच्छेदछेद सारखे
3/8 व 5/8
भिन्नच्छेदछेद वेगवेगळे
2/3 व 2/5

३. तुलना व क्रम

छेद सारखाज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा.
5/7 > 3/7
अंश सारखाज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा.
3/4 > 3/5
चढता क्रम = लहानाकडून मोठ्याकडे. उतरता क्रम = मोठ्याकडून लहानाकडे.
⚠️ सामान्य चूक : छेद मोठा म्हणजे अपूर्णांक मोठा असे नाही. 1/8 हा 1/2 पेक्षा लहान आहे, कारण पूर्णाचे जास्त भाग केल्यास प्रत्येक भाग लहान होतो.

४. अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक

प्रकारओळखउदाहरण
छेदाधिकअंश छेदापेक्षा लहान (किंमत 1 पेक्षा कमी)3/4, 9/10
अंशाधिकअंश छेदापेक्षा मोठा (किंमत 1 पेक्षा जास्त)7/4, 9/8
पूर्णांकयुक्तपूर्ण संख्या + अपूर्णांक2 3/5 (दोन पूर्णांक तीन बटे पाच)
💡 अंश व छेद सारखे असतील (7/7) तर अपूर्णांकाची किंमत 1 असते.

५. परस्पर रूपांतर

अंशाधिक → पूर्णांकयुक्त : अंशाला छेदाने भागा. भागाकार = पूर्णांक, बाकी = नवा अंश, छेद तोच.
पूर्णांकयुक्त → अंशाधिक : (पूर्णांक × छेद) + अंश = नवा अंश, छेद तोच.
17/5 : 17 ÷ 5 = 3, बाकी 2 → 3 2/5 4 3/7 : (4 × 7) + 3 = 31 → 31/7

8 समान भागांपैकी 5 रंगीत = 5/8
📝 सरावासाठी : चित्र असलेल्या प्रश्नात आधी एकूण समान भाग मोजा (छेद), मग रंगीत किंवा विचारलेले भाग मोजा (अंश).

इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा सराव : घटक - अपूर्णांक

निर्मिती: गजानन बोढे - द टीचर

No comments:

Post a Comment

↑