📘 प्रस्तावना
इंग्रजी व्याकरणातील Parts of Speech (शब्दांच्या जाती) मध्ये Noun (नाम) हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे. व्यक्ती, वस्तू, स्थळ, प्राणी, गुणविशेष, कल्पना किंवा भावना यांच्या नावांना Noun म्हणतात. उदा. Mandar, pen, Mumbai, cow, courage. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ७ वी) या घटकावर हमखास प्रश्न विचारले जातात.
नामाचे पाच प्रकार आहेत : Common Noun (सामान्य नाम), Proper Noun (विशेष नाम), Concrete Noun (मूर्त नाम), Abstract Noun (भाववाचक नाम) आणि Collective Noun (समुदायवाचक नाम). या सराव चाचणीत एकूण 30 प्रश्न आहेत. त्यात नाम ओळखणे, वाक्यातील नामांची संख्या शोधणे, वेगळा शब्द (odd man out) ओळखणे, योग्य noun रूप निवडणे, रिकामी जागा भरणे आणि नामाच्या प्रकारांवरचे प्रश्न आहेत.
✅ चाचणी कशी सोडवायची?
- सुरुवातीला दिसणाऱ्या फॉर्ममध्ये तुमचे पूर्ण नाव आणि इयत्ता / तुकडी लिहा आणि "सराव सुरू करा" बटण दाबा.
- प्रश्न नीट वाचा आणि तुम्हाला योग्य वाटणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
- उत्तर बरोबर की चूक ते लगेच दिसेल आणि खाली अचूक उत्तराचे स्पष्टीकरण येईल. ते काळजीपूर्वक वाचा. एकदा पर्याय निवडल्यावर उत्तर बदलता येत नाही.
- पुढच्या प्रश्नासाठी "पुढील" बटण दाबा. मागचा प्रश्न पाहण्यासाठी "मागील" बटण वापरा.
- सर्व 30 प्रश्न सोडवल्यावर तुमचा स्कोअर दिसेल. "स्कोअर शिक्षकांना पाठवा" बटण एकदाच दाबा.
- सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह पाहण्यासाठी "उत्तर सूची पहा" दाबा आणि पुन्हा सराव करण्यासाठी "पुन्हा सराव करा" वापरा.
शुभेच्छा! 🌟
इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव : घटक - Noun
निर्मिती: गजानन बोढे - द टीचर
No comments:
Post a Comment