GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Wednesday, April 26, 2023

PHONIC WORKSHEET INTRODUCING SOUNDS OF LETTERS OF ALPHABET FOR GRADE 1 LEARNERS

शिक्षक-पालक बंधु-भगिनींनो नमस्कार! यंदा इयत्ता 1 लीत दाखलपात्र बालकांच्या इंग्रजी भाषा अध्ययन-तयारीसाठी ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEETS ची क्रमबद्ध मालिका सुरू केलेली आहे. यापूर्वी दोन WORKSHEETS इथे प्रसारित केलेल्या आहेत. त्या दोन्ही WORKSHEETS आपल्या विद्यार्थ्यानी तथा पाल्यांनी सोडवलेल्या आहेत.अर्थातच आपण त्यांना गरजेनुसार मदत केलेली असेलच. आधी प्रसारित केलेल्या दोन्ही WORKSHEETS च्या अभ्यासातून आपल्या विद्यार्थी व पाल्यांना इंग्रजी भाषेतील 26 मुळाक्षरांच्या 26 आवाजांचा परिचय होणे अपेक्षित होते. त्या दोन्ही WORKSHEETS मध्ये चित्रांतील वस्तूंची इंग्रजी नावे SMALL लिपीत छापलेली होती व त्या नावांतील पहिल्या अक्षरांचा आवाज PLAY बटन दाबून ऐकण्याची सुविधा दिलेली होती. आज याच WORKSHEETS च्या मालिकेतील तिसरी WORKSHEET आपल्या विद्यार्थी व पाल्यांसाठी घेऊन आलोय.आजच्या WORKSHEET मध्ये SMALL लिपीतील अक्षरांसोबतच CAPITAL लिपीतील अक्षरे दर्शवलेली आहेत. इंग्रजी भाषेत दोन एकच अक्षर दोन पद्धतींनी लिहिले जाते व दोन्ही पद्धतींनी लिहीलेल्या अक्षरांचे आवाज सारखेच असतात हे मुलांना समजावे यासाठी आजची WORKSHEET उपयुक्त ठरेल असा विश्वास मला वाटतो. ही WORKSHEET कशी सोडवायची याबाबत WORKSHEETS मध्येच सूचना दिलेल्या आहेत. आपल्या विद्यार्थी व पाल्यांपर्यन्त ही WORKSHEET पोहचवा. आपले अभिप्राय अवश्य कळवा.

No comments:

Post a Comment

↑