GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Sunday, April 16, 2023

ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR PRE-PRIMARY AND GRADE 1 BEGINNERS-17/04/2023

शिक्षक,पालक बंधु-भगिनींनो! सर्वांना सस्नेह नमस्कार. इथे प्रसारित होत असलेल्या ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEETS आपण आपल्या विद्यार्थी व पाल्यांपर्यंत पोहचवत आहात व त्यांच्याकडून सोडवून घेत आहात. त्याबद्दल सर्वांचे मनस्वी धन्यवाद. आपण देत असलेल्या उत्तम प्रतिसादामुळे कामातला उत्साह वाढत आहे. अर्थातच हे WORKSHEET निर्मितीचे काम मी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन सरावासाठी करतो आहे. माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबतच आपल्याही विद्यार्थ्यांना तथा पाल्यांना या WORKSHEETS उपयुक्त ठरत असतील तर मला आनंदच आहे. आतापर्यंत 1000+++ वियार्थी-शिक्षक-पालकांनी इथे प्रसारित झालेल्या WORKSHEETS सोडवलेल्या आहेत. यावरून या WORKSHEETS ची उपयुक्तता माझ्या लक्षात येते आहे. WORKSHEETS च्या निर्मितीचे व इथे प्रसारित करण्याचे हे काम नियमित सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. या WORKSHEETS च्या उपयुक्तेबाबत आपल्या प्रतिक्रिया समजून घ्यायला मला आवडेल. आपण आपल्या प्रतिक्रिया COMMENT SECTION मध्ये नोंदवाव्यात ही विनंती आहे.
आजची WORKSHEET कशी सोडवायची याबद्दल आपल्या विद्यार्थी तथा पाल्यांना कृपया पुढीलप्रमाणे मदत कराल.-----
आजची INTERACTIVE WORKSHEET ही यंदा इयत्ता १ लीत दाखलपात्र बालकांच्या इंग्रजी भाषा अभ्यासाच्या पूर्वतयारीसाठी उपयुक्त आहे. या WORKSHEET मध्ये 4 चित्रसंच आहेत. प्रत्येक चित्रसंचाच्या वरील बाजूस रिकाम्या चौकटी दिसतील.त्या प्रत्येक रिकाम्या चौकटीच्या खाली चित्रसंचातील चित्रांत दिसणार्‍या वस्तूंची इंग्रजी भाषेतील नावे छापलेली आहेत. सोबतच प्रत्येक शब्दांखाली PLAY बटन दिलेले आहे. जसे प्रत्येक शब्दांखाली PLAY बटन आहे तसेच ते प्रत्येक चित्रसंचातील चित्रांच्या खालीसुद्धा दिलेले आहे. सर्वप्रथम रिकाम्या चौकटींच्या खाली दिसणारे PLAY बटन दाबून ऐकू येणारा शब्द नीट लक्षात ठेवा. त्यानंतर चित्रसंचातील प्रत्येक चित्राखाली दिसणारे PLAY बटन दाबा. रिकाम्या चौकटीखालचे PLAY बटन दाबल्यानंतर जो शब्द ऐकू आला होता तोच शब्द, ज्या चित्राखालचे PLAY बटन दाबल्यावर ऐकू येईल त्या चित्राला बोटाने स्पर्श करून संबंधित रिकाम्या चौकटीत ओढत न्यायचा व चित्रावरील बोट उचलून घ्यायचे म्हणजे ते चित्र त्या रिकाम्या चौकटीत डकवले जाईल. हीच कृती या WORKSHEET मधील प्रत्येक चित्रसंचांतील चित्रांच्याबाबतीत करून झाल्यानंतर शेवटी दिसणारे FINISH बटन दाबा. स्वतःचे नाव लिहा व पुन्हा एकदा FINISH बटन दाबून WORKSHEET सबमिट करा. ही WORKSHEET मुलांना इंग्रजी भाषेतील 26 मुळाक्षरांचे प्रतिनिधित्व करणार्‍या 26 चित्रांतील वस्तूंच्या इंग्रजी नावांचा परिचय करून देण्यास मदत करेल.

1 comment:

↑