🎈 English Fun Time – खेळ कसा खेळायचा?
प्रत्येक खेळ सोपा आहे. आवाज ऐका, बोटाने दाबा आणि ⭐ तारे जिंका!
🔤 १. Letter Hunt (अक्षर शोधा)
- फोन/टॅब्लेटवर आवाज ऐका. उदा. "Find the letter S".
- खाली दिलेल्या ३ अक्षरांपैकी तेच अक्षर दाबा.
- बरोबर असल्यास तारा मिळेल! चूक झाल्यास पुन्हा प्रयत्न करा.
🔊 पुन्हा ऐकायचे असल्यास "पुन्हा ऐका" बटण दाबा.
🍎 २. First Sound (पहिला आवाज)
- चित्र पहा आणि त्याचे नाव ऐका. उदा. 🍎 "apple".
- शब्दाचा पहिला आवाज कोणत्या अक्षराचा आहे ते ठरवा. (apple → a)
- तेच अक्षर दाबा.
💡 शब्द स्वतः मोठ्याने म्हणून पहा, मग पहिला आवाज सोपा वाटतो.
🐱 ३. Build a Word (शब्द बनवा)
- चित्र पहा. उदा. 🐱 (cat).
- खाली विखुरलेली अक्षरे आहेत. शब्दाच्या क्रमाने एकेक अक्षर दाबा: c → a → t.
- बरोबर अक्षर रिकाम्या जागेत जाईल आणि त्याचा आवाज येईल. शेवटी पूर्ण शब्द ऐकू येईल.
💡 प्रत्येक अक्षराचा आवाज ऐकून तो जोडून शब्द म्हणा: c-a-t → cat.
🃏 ४. Memory Match (जोड्या जुळवा)
- सर्व पत्ते ❓ असे उलटे असतात. एक पत्ता दाबा, मग दुसरा.
- एक पत्ता चित्र आणि दुसरा त्याचा शब्द असेल तर जोडी जुळते. उदा. 🐱 आणि cat.
- जोडी जुळली तर पत्ते हिरवे होऊन तसेच राहतात. नाही जुळली तर परत उलटे होतात, म्हणून नीट लक्षात ठेवा.
- सर्व ४ जोड्या जुळल्या की तारा मिळतो!
👩🏫 शिक्षक व पालकांसाठी सूचना
- आवाज येण्यासाठी फोनचा आवाज (volume) सुरू ठेवा. पहिल्या वेळी स्क्रीनला एकदा स्पर्श करा.
- मुलाला स्वतः खेळू द्या. चूक झाली तरी रागवू नका, प्रोत्साहन द्या.
- एका वेळी ५–१० मिनिटे खेळ पुरेसा आहे.
- मिळालेले तारे त्याच फोन/ब्राउझरमध्ये जमा राहतात.
⚙️ शिक्षकांसाठी: आवाज निवडा
यादी या फोनवर इन्स्टॉल असलेल्या English voices ची आहे. निवड याच फोनमध्ये सर्व खेळांसाठी कायम राहते. "स्वयंचलित" निवडल्यास अक्षरांसाठी British आणि शब्दांसाठी Indian आवाज आधी शोधला जातो. "मराठी उच्चार" निवडल्यास क् ॲ ट् असे ध्वनी मराठी/हिंदी voice ने बोलले जातात.

No comments:
Post a Comment