🎯 CVC Word Blending – खेळ कसा खेळायचा?
अक्षरांचे आवाज ऐका आणि ते जोडून शब्द बनवा!
c + a + t = cat 🐱
CVC म्हणजे Consonant (व्यंजन) – Vowel (स्वर) – Consonant. निळे अक्षर व्यंजन आणि गुलाबी अक्षर स्वर आहे.
🔊 १. शिका (Learn)
- शब्दाची तीन अक्षरे दिसतात. प्रत्येक अक्षर एकेक करून पिवळे होते आणि त्याचा आवाज येतो.
- शेवटी पूर्ण शब्द ऐकू येतो आणि त्याचे चित्र दिसते. उदा. cat 🐱.
- मुलाने तो शब्द मोठ्याने म्हणायचा: "तुम्ही म्हणा: cat".
- पुन्हा ऐकण्यासाठी "🔁 पुन्हा ऐका" आणि पुढे जाण्यासाठी "पुढचा शब्द ▶" दाबा.
💡 कोणत्याही अक्षरावर दाबल्यास त्याचा आवाज पुन्हा ऐकता येतो.
🎯 २. खेळा (Play)
- फक्त अक्षरांचे आवाज येतात, पूर्ण शब्द सांगितला जात नाही.
- आवाज मनात जोडून शब्द ओळखा. उदा. kuh – ah – tuh → cat.
- खाली दिलेल्या ३ चित्रांपैकी बरोबर चित्र दाबा.
- बरोबर असल्यास ⭐ तारा मिळतो! चूक झाल्यास पुन्हा प्रयत्न करा.
💡 अडचण आल्यास "🔁 पुन्हा ऐका" दाबून आवाज पुन्हा ऐका.
🧩 ३. शब्द-कुटुंब निवडा
- वर -at, -an, -ig, -op, -ug अशी बटणे आहेत. एक कुटुंब निवडल्यास फक्त त्याच प्रकारचे शब्द येतात (उदा. cat, hat, bat, rat).
- "सर्व" निवडल्यास सर्व कुटुंबांतील शब्द येतात.
- एका फेरीत प्रत्येक शब्द एकदाच येतो. सर्व शब्द संपले की "पूर्ण झाले" दिसते आणि पुन्हा खेळता येते.
👩🏫 शिक्षक व पालकांसाठी सूचना
- आधी "शिका" मध्ये ५–६ शब्द दाखवा, मग "खेळा" मध्ये मुलाला स्वतः खेळू द्या.
- खेळाच्या खाली "⚙️ शिक्षकांसाठी: आवाज निवडा" हा विभाग आहे. तेथे अक्षरांचा आणि शब्दांचा आवाज निवडता येतो. "मराठी उच्चार (क् ॲ ट्)" हा पर्यायही तेथे आहे.
- आवाज स्पष्ट येण्यासाठी फोनचा आवाज (volume) सुरू ठेवा. पहिल्या वेळी स्क्रीनला एकदा स्पर्श करा.
- एका वेळी ५–१० मिनिटे खेळ पुरेसा आहे. चूक झाली तरी मुलाला प्रोत्साहन द्या.
- मिळालेले तारे इतर खेळांसोबत त्याच फोन/ब्राउझरमध्ये जमा राहतात.
🎯 CVC Word Blending⭐ 0
c – a – t = cat
अक्षरांचे आवाज ऐका आणि ते जोडून शब्द बनवा!
⚙️ शिक्षकांसाठी: आवाज निवडा
"मराठी उच्चार" निवडल्यास क् ॲ ट् असे ध्वनी मराठी/हिंदी voice ने बोलले जातात (voice नसेल तर English उच्चार वापरला जातो). यादी या फोनवर इन्स्टॉल असलेल्या English voices ची आहे. निवड याच फोनमध्ये सर्व खेळांसाठी कायम राहते. "स्वयंचलित" निवडल्यास अक्षरांसाठी British आणि शब्दांसाठी Indian आवाज आधी शोधला जातो.

शिक्षक,पालक बंधू - भगिनींनो, हा Game आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे असे वाटते ना? कृपया कळवाल आपली प्रतिक्रिया! काही सुधारणात्मक सूचना असतील तर स्वागतच आहे.
ReplyDelete