गेल्या दोन दिवसांपासून पालक भेटी सुरू केलेल्या आहेत.
बदलीने मिळालेल्या माझ्या नव्या शाळेत यंदा इयत्ता १ लीत एकूण १८ बालक प्रवेशपात्र आहेत. पैकी दोन बालकांच्या कुटुंबाचं स्थलांतर झालंय तर ६ बालकांच्या पालकांनी तालुक्याच्या खासगी व्यवस्थापनाच्या शाळेत सेमी इंग्रजी वर्गात वार्षिक शुल्क रूपये १७०००/- भरून दाखल केलंय.
उरलेले १० बालक माझ्या शाळेत इयत्ता १ लीत दाखल होतील.
सेमी इंग्रजी माध्यमात दाखल करण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं- "इंग्रजी भाषा आमच्या मुलांना वाचता - लिहिता - बोलता आली पाहिजे..."
दुसरं कारण त्यांनी सांगितलं -
"पुरेसे शिक्षक नाहीत आपल्या गावच्या शाळेत."
पुरेशा शिक्षक संख्येअभावी मला इयत्ता १, २ व ३ वर्ग मला घ्यावे लागणार आहेत.
दर्जेदार इंग्रजी भाषा शिक्षणासोबतच त्या - त्या वर्गांच्या इतर सर्व विषयांवर काम करताना माझ्यातील क्षमतांचा कस लागणार आहे याची जाणीव आहे.
सेवा प्रदार्पणातील पहिल्या शाळेत २०१३ - १४ ला उद्भवलेल्या - अनुभवलेल्या प्रसंगाची आठवण यानिमित्ताने झाली..त्यावेळी इयत्ता १ लीत दाखलपात्र एकूण ८ मुलांपैकी केवळ २ मुले माझ्या त्या शाळेत दाखल झाली होती..उर्वरित ६ मुलं नजीकच्या गावात नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालकांनी परस्पर दाखल करून घेतली होती..या प्रसंगाने माझ्यातल्या शिक्षकास निराश केले होते, हलवून सोडले होते. पुढे इंग्रजी भाषा शिक्षणावर केलेल्या कामामुळे अवघ्या दोन महिन्यातच ती ६ मुलं पालकांनी माझ्या शाळेत दाखल करून घेतली होती..
सध्याच्या शाळेत उद्भवलेला प्रसंगही अगदी तसाच आहे. 'इतिहासाची पुनरावृत्ती' होईल अशी आशा बाळगून आहे.
स्वतःला सिद्ध करण्याची संधी म्हणून मी या प्रसंगाकडे बघतोय...😊
#शिक्षकांच्या_रिक्त_जागा_तातडीने_भरा.
No comments:
Post a Comment