Search This Blog

प्रिय सर्व, नमस्कार! ब्लॉगवर आपले स्वागत आहे...

Friday, September 29, 2023

Present Continuous Tense: Interrogative sentences: Yes/No type questions

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Present Continuous Tense: Interrogative sentences: Yes/No type questions.

आजचा इंग्रजी भाषा अभ्यास DATE - 29.09.2023

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणीतरी काहीतरी करत आहे का ?

कोठेतरी काहीतरी होत आहे का ?

कोठेतरी काहीतरी घडत आहे का ?👆

असं सुचविणारे प्रश्न Present Continuous Tense मध्ये विचारले जातात.

या प्रश्नांचे म्हणजेच प्रश्नार्थक वाक्यांचे 'स्ट्रक्चर' पुढीलप्रमाणे असते.

👇

[ Am / Is / Are + S + V4+ O + ? ]

👆

या 'स्ट्रक्चर' मध्ये विचारले जाणारे प्रश्न आज वर्गात आपण तयार करायला व विचारायला शिकलो होतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सोबतच आपण, 

प्रश्नांमध्ये you, we ,they असल्यास प्रश्नांची सुरूवात Are ने करावी. 

प्रश्नांमध्ये he, she, it, Om, Shruti असल्यास प्रश्नांची सुरूवात 'Is' ने करावी. 

प्रश्नांमध्ये 'I' असल्यास प्रश्नांची सुरूवात 'am' ने करावी. 

👆

हे देखील समजून घेतलं होतं.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आता इथे  'you' हा 'S' वापरून विचारले जाणारे प्रश्न लिहून पाठवतोय...वहीत लिहून घ्या...पुन्हा पुन्हा वाचा...प्रश्न विचारत असतानाचे व्हिडिओ बनवून पाठवा.

👇

Are you going to school ? = तु शाळेत जात आहेस  का ? / तुम्ही शाळेत जात आहात का ?

Are you coming there ? = तु तिकडे येत आहेस का ? / तुम्ही तिकडे येत आहात का ?

Are you reading books ? = तु पुस्तके वाचत आहेस का?/ तुम्ही पुस्तके वाचत आहात का ?

Are you writing Diary ? = तु डायरी लिहित आहेस का ?/ तुम्ही डायरी लिहीत आहात का ?

Are you telling stories ? = तु स्टोरीज सांगत आहेस का ? / तुम्ही स्टोरीज सांगत आहात का ? 

Are you bringing apples ? = तु ॲपल्स आणत आहेस का ?/ तुम्ही ॲपल्स आणत आहात का ?

Are you taking tea ? = तु चहा घेत आहेस का ?/ तुम्ही चहा घेत आहात का ?

Are you giving pen ? = तु पेन देत आहेस का ?/ तुम्ही पेन देत आहात का ?

Are you putting on clothes ? = तु कपडे घालत आहेस का ?/ तुम्ही कपडे घालत आहात का ?

Are you putting off foot wares ? = तु चप्पल - जोडे काढून ठेवत आहेस का ?/तुम्ही चप्पल - जोडे काढून ठेवत आहात का ?_ 

Are you waking up at 6 in the morning everyday ? = तु रोज सकाळी सहा वाजता झोपेतून उठत आहेस का?/ तुम्ही रोज सकाळी सहा वाजता झोपेतून उठत आहात का?

Are you brushing your teeth eveyday ? = तु रोज तुझे दात घासत आहेस का ?/तुम्ही रोज तुमचे दात घासत आहात का ?

Are you studying everyday ? = तु रोज अभ्यास करत आहेस का ?/तुम्ही रोज अभ्यास करत आहात का ?

Are you playing games everyday ? = तु रोज गेम्स खेळत आहेस का ?/तुम्ही रोज गेम्स खेळत आहात का ? 

Are you taking bath everyday ? = तु रोज आंघोळ करत आहेस का ?/तुम्ही रोज आंघोळ करत आहात का ? 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 GAJANAN BODHE -THE TEACHER

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners

This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...